Muskmelon Seeds: त्वचेपासून वजन नियंत्रण! टरबुजाच्या बिया म्हणजे खजिना... मात्र खाण्याची योग्य पद्धत कोणती?

Anirudha Sankpal

पोषक तत्वांचा खजिना

आपण सहसा फेकून देणाऱ्या टरबुजाच्या बियांमध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट, फायबर, मॅग्नेशियम, झिंक, आयर्न आणि पोटॅशियम हे घटक मुबलक प्रमाणात असतात.

हृदयाचे आरोग्य

या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

उत्तम पचनक्रिया

बियांमधील फायबर अन्नाचे पचन हळूवार करण्यास मदत करते, ज्यामुळे बद्धकोष्टता (कब्ज), गॅस आणि अपचनाचा त्रास कमी होऊन आतडे निरोगी राहतात.

प्रतिकारशक्ती वाढते

टरबुजाच्या बियांमधील 'झिंक' शरीराच्या रोगप्रतिकारक पेशींच्या निर्मितीला गती देते आणि शरीराला आजारांपासून वाचवते.

अँटीऑक्सिडंट्सचा फायदा

यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला हानिकारक फ्री-रेडिकल्सपासून वाचवतात, ज्यामुळे पेशींचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.

त्वचेसाठी फायदेशीर

बियांमध्ये असलेले निरोगी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचा हायड्रेट ठेवतात आणि अकाली येणाऱ्या सुरकुत्या रोखून त्वचा चमकदार बनवतात.

वजन नियंत्रण

यात प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, हे खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते; ज्यामुळे भूक कमी लागून वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

घरीच तयार करण्याची पद्धत

टरबुजाच्या बिया फळातून काढून, त्यांचा गर स्वच्छ धुवून घ्यावा, त्यानंतर त्या कडक उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्यात.

खाण्याची योग्य पद्धत

उन्हात पूर्णपणे वाळलेल्या या बिया मंद आचेवर हलक्या भाजून किंवा सुक्या मेव्याप्रमाणे रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात समाविष्ट कराव्यात.

येथे क्लिक करा