पुढारी वृत्तसेवा
संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते मनाला आणि शरीराला कसं बरं करू शकतं? जाणून घेवूया यामागचं रंजक विज्ञान!
संगीत मेंदूतील 'न्यूरोप्लास्टिसिटी' वाढते. म्हणजेच मेंदू स्वतःला रिपेअर करतो आणि नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करतो.
संशोधनानुसार, संथ संगीत ऐकल्याने लहान मुलांमध्ये 'ऑक्सिटोसिन' वाढते. यामुळे मुलांचा भाषिक आणि बौद्धिक विकास वेगाने होतो.
क्लासिक किंवा लो-फाय (Lo-Fi) संगीत ऐकल्याने मेंदूतील 'अल्फा लहरी' सक्रिय होतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांची आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती सुधारते.
हॉपकिन्स मेडिसिनच्या अभ्यासानुसार, आवडीचे संगीत ऐकल्याने मेंदूत 'डोपामाइन' आणि 'सेरोटोनिन' हे आनंदाचे संप्रेरक स्रवतात, जे डिप्रेशन कमी करतात.
गाणी ऐकल्यामुळे मेंदूतील आठवणींचे केंद्र (हिप्पोकॅम्पस), भावनांचे केंद्र (अमिग्डाला) आणि निर्णयक्षमता वाढवणारा भाग उद्दीपित होतो.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, संगीताचा ताल आपल्या हृदयाच्या गतीशी मॅच होतो. शास्त्रीय संगीत ऐकल्याने हाय बीपी आणि अँझायटी नियंत्रित राहते.
संगीत ऐकल्याने मेंदू वेदनेच्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. यामुळे शरीरात 'एन्डॉर्फिन' नैसर्गिक वेदनाशामक तयार होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, संगीत ऐकणे म्हणजे मेंदूसाठी जिममध्ये कसरत करण्यासारखेच आहे.
जेवताना फक्त १० मिनिटे संथ संगीत ऐकल्यास 'कॉर्टिसोल' हा तणाव वाढवणारा संप्रेरक झपाट्याने कमी होतो.
रात्री झोपण्यापूर्वी १५ ते २० मिनिटे आवडीची गाणी ऐकल्याने मन शांत होते आणि उत्तम झोप येण्यास मदत होते.