Mutton Word Origin|शेळीच्या मांसाला 'मटण' का म्हणतात? याला आहे १,००० वर्षांचा रंजक इतिहास!

पुढारी वृत्तसेवा

आपल्‍याकडे 'मटण' हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर येते ते बोकडाचे मांस!

जगातील इतर देशांमध्ये 'मटण'चा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. परदेशात मटण मागितल्यास शेळीचे मांस मिळत नाही!

युके (UK), ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये प्रौढ मेंढीचे मांसाला 'मटण' म्‍हणतात.

जागतिक वर्गवारीनुसार, शेळीच्या मांसाला स्पष्टपणे 'गोट मीट' म्हटले जाते.

हा शब्द जुन्या फ्रेंच भाषेतील 'मोटॉन' (Mouton) पासून आला असून, त्याचा अर्थ मेंढी असा होतो.

इ.स. १०६६ मध्ये जेव्हा नॉर्मन लोकांनी इंग्लंडवर विजय मिळवला, तेव्हा फ्रेंच भाषेचा इंग्रजी खाद्यसंस्कृतीवर मोठा प्रभाव पडला आणि 'मोटॉन' हा शब्द इंग्रजीत रूढ झाला.

ब्रिटीश राजवटीत इंग्रजीतील 'मटण' हा शब्द भारतीयांनी सहज उपलब्ध असलेल्या शेळीच्या मांसासाठी वापरायला सुरुवात केली.

त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कोणी सांगेल की 'मटण' म्हणजे मेंढीचे मांस, तेव्हा ते चुकीचे नसतील!

भारताप्रमाणेच कॅरिबियन बेटांवर देखील स्थानिक लोक शेळीच्या मांसाला 'मटण'च म्हणतात.

येथे क्‍लीक करा.