Rahul Shelke
यंदा महानगरपालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहे. म्हणजे एका वॉर्डमधून एक नाही, तर चार नगरसेवक निवडले जाणार आहेत.
आधी एका वॉर्डमधून फक्त एक नगरसेवक निवडला जायचा. एक मतदार - एक उमेदवार - एक मत असं गणित असायचं.
आता एक वॉर्ड = 4 नगरसेवक अशी रचना असणार आहे. म्हणजे एकाच भागातून चार प्रतिनिधी महानगरपालिकेत जाणार.
एकाच मतदाराला चार वेगवेगळ्या उमेदवारांना मत द्यायचं आहे.
होय. कारण चार वेळा मत दिलं नाही तर तुमचं मत ग्राह्य धरलं जात नाही.
हो. तुम्ही चार वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मत देऊ शकता.
हो. जर एखाद्या पक्षाचे चार उमेदवार आवडत असतील, तर चारही मतं एकाच पक्षाला देता येतात.
एका भागाला जास्त प्रतिनिधी, महिलांना व विविध घटकांना संधी आणि एका नगरसेवकावरील अवलंबित्व कमी होतं.