MPSC अध्यक्षांना दरमहा किती पगार मिळतो? आकडा वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

पुढारी वृत्तसेवा

MPSC अध्यक्षांना महिन्याला किती पगार मिळतो?

अध्यक्षांच्या वेतनासोबत अनेक शासकीय सुविधा आणि भत्तेही मिळतात.

महिन्याला 2.25 लाख

MPSC अध्यक्षांचे मासिक वेतन 2.25 लाख आहे. म्हणजे वर्षाला मूळ वेतन सुमारे ₹27 लाख होते.

फक्त पगारच नाही!

2.25 लाख हे केवळ मासिक वेतन आहे. याशिवाय नियमानुसार विविध भत्ते मिळतात.

सरकारी सुविधा

अध्यक्षांना पदानुसार शासकीय सुविधा मिळतात. यामध्ये निवास, वाहन आणि इतर अधिकृत सुविधा असू शकतात.

पदाची जबाबदारी मोठी

MPSC ही राज्यातील महत्त्वाची घटनात्मक संस्था आहे. राज्यातील अनेक स्पर्धा परीक्षांची जबाबदारी आयोगावर असते.

विद्यार्थ्यांचा आक्रोश

परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

राजीनाम्याची मागणी

मोर्चात विद्यार्थ्यांनी MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी केली. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणीही करण्यात आली.

चौकशीची मागणी

परीक्षांशी संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पुढे आली.

पगारासोबत जबाबदारीही!

2.25 लाखांचा पगार, पण जबाबदारीही तितकीच मोठी आहे, पण विद्यार्थ्यांचा एकच सवाल आहे तो म्हणजे MPSC परीक्षांमध्ये पारदर्शकता कधी येणार?

मोठ्या आवाजाचा फक्त कानावरच नाही तर मन आणि मेंदूवर काय परिणाम होतो?

येथे क्लिक करा