Rava Ladoo Diwali| तुपातील रव्याचे लाडू बनवा असे की, तोंडात विरघळतील लगेच

स्वालिया न. शिकलगार

ताटात सजवलेले रवा लाडू आणि त्यावर सांडलेले साजूक तूप.

साहित्य : बारीक रवा २ कप, पिठीसाखर २ कप, साजूक तूप, दूध ३ चमचे

वेलची व जायफळ पूड १ छोटा चमचा, काजू, मणुके

कढईत २ चमचे तूप घालून मध्यम आचेवर रवा भाजा

रवा लाल करू नका, फक्त त्याचा कच्चा वास गेला पाहिजे

भाजलेल्या रव्यावर ३ चमचे कोमट दूध शिंपडा व चांगले मिक्स करा

यानंतर रवा झाकून ५ मिनिटे बाजूला ठेवा.

रव्यात पिठीसाखर आणि वेलची-जायफळ पूड एकत्र करा.

रवा गरम असताना साखर कधीही घालू नका, नाहीतर साखरेचे पाणी सुटेल

उरलेले साजूक तूप थोडे कोमट करून रव्यात टाका.

तसेच तुपात परतून घेतलेला सुकामेवा घाला.

हाताने सर्व मिश्रण चांगले चोळून एकजीव करा

आता हाताला थोडे तूप लावून सहज लाडू बनवा

Crispy Chakli Diwali|चकलीच्या पिठात टाका हे २ खास पदार्थ, खमंग-खुसखुशीत बनेल चकली