रणजित गायकवाड
एमएस धोनीची गणना जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षकांमध्ये केली जाते. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट या यादीत अग्रस्थानी आहे. त्याने यष्टिरक्षक म्हणून खेळताना 5570 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यांनी एकूण 17 शतके झळकावली आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाउचर हा यष्टिरक्षक म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
त्याने एकूण 5515 कसोटी धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 5 शतकांचा समावेश आहे.
भारताचा महेंद्र सिंह धोनी यष्टिरक्षक म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहेत.
त्याने 90 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 4876 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 6 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे.
इंग्लंडचा ॲलेक स्टुअर्ट याने यष्टिरक्षक म्हणून 82 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 4540 धावा केल्या आहेत.
यामध्ये 6 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.
झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर याने कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून एकूण 4404 धावा केल्या आहेत.
यामध्ये 12 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.