Namdev Gharal
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाला १२ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. हा जगातील अतिशय भव्यदिव्य व महागडा विवाह सोहळा ठरला. अशाच काही विवाह सोहळयांविषयी जाणून घेऊया
अमेरिकन सेलिब्रीटी किम कर्दाशिअन व क्रिस हम्फ्रीज यांचे २०११ साली लग्न झाले या लग्नासाठी १० मिलियन डॉलर्स इतका खर्च आला होता.
ब्रिटनचा प्रिन्स विल्यम व केट मिडल्टन यांचा शाही विवाहसोहळा २०११ साली पार पडला यासाठी ३४ मिलियन डॉलर्स इतका खर्च आला.
प्रिन्स हॅरी व मेघन मॉर्कल या चर्चेतील जोडीचा विवाह २०१८ साली पार पडला. यासाठी ४५ मिलियन डॉलर्स इतका खर्च आला
नुकताच काही दिवसांपूर्वी सर्वाधिक चर्चेला गेलेल्या ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस व लॉरेन सॅझेंच यांच्या विवाहासाठी ५६ मिलीयन इतकी रक्कम खर्च झाली
लक्ष्मी मित्तल यांची मुलगी वनिशा मित्तल व अमित भट यांचा विवाह २००४ साली पार पडला यासाठी त्यावेळी ६० मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आला होता.
युएईचे शेख मोहम्मद बीन राशिद अल मक्तुम व राजकुमारी हीनद यांचा १९८९ मध्ये विवाह संपन्न झाला होता. त्यावेळी या लग्नासाठी १०० मिलीयन डॉलर्स खर्च करण्यात आले होते.
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची लाडकी मुलगी इशा अंबानी व आनंद पिरामल यांचा विवाह २०१८ मध्ये संपन्न झाला या लग्नासाठी १०० मिलीयन डॉलर्स इतका खर्च आला होता.
ब्रिटनची सर्वात चर्चिली गेलेली राणी म्हणजे लेडी डायना व प्रिस्न चार्ल यांचा विवाह १९८१ मध्ये पार पडला या सोहळयासाठी राजपरिवारातर्फे १४० मिलियन डॉलर्स इतका खर्च केला होता.
मुकेश अंबानी व निता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा गतसाली झालेला विवाह सोहळा जगभरात चर्चिला गेला यासाठी अंबानी परिवारातर्फे ६०० मिलीयन इतकी रक्कम खर्च करण्यात आला.