Most Consumed Fruits | जगात सर्वाधिक खाल्ली जाणारी फळे कोणती आहेत?

अविनाश सुतार

अनेक फळे चव, पौष्टिकता आणि विविध उपयोगांसाठी जगभर लोकप्रिय आहेत

ही फळे जागतिक उत्पादन, व्यापार आणि रोजच्या आहारात मोठ्या प्रमाणावर आढळतात

केळी (Banana)

केळी हे जगातील सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ आहे. दरवर्षी ११५ ते १७९ दशलक्ष टन केळीचे उत्पादन होते. वर्षभर उपलब्ध असल्याने केळी जागतिक फळ निर्यातीतही आघाडीवर आहेत

कलिंगड (Watermelon)

कलिंगड हे जगभरात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते, दरवर्षी १०४ दशलक्ष टन उत्पादन होते. अनेक देशांमध्ये टरबूज उन्हाळ्यातील मुख्य फळ मानले जाते

सफरचंद (Apple)

जगभरात सफरचंद हे सर्वाधिक खाल्ले जाणारे फळांपैकी एक आहे. दरवर्षी ८६ ते ९७ दशलक्ष टन सफरचंदाचे उत्पादन होते. हे फळ विविध प्रकारात उपलब्ध असून रस काढून किंवा शिजवून खाल्ले जाते

संत्री (Orange)

संत्रे हे जगातील सर्वाधिक खाल्ले जाणारे सिट्रस फळ आहे. दरवर्षी सुमारे ७५ ते ७६ दशलक्ष टन उत्पादन होते. व्हिटॅमिन सी आणि आंबट-गोड स्वादासाठी संत्री जगभरात खाल्ले जाते

द्राक्षे (Grapes)

द्राक्षे दरवर्षी सुमारे ७९ दशलक्ष टन उत्पादनासह जगभरात मोठ्या प्रमाणावर खाल्ली जातात. द्राक्षे ताजी, मनुका (सुकवून), किंवा वाइन बनवण्यासाठी वापरली जातात

आंबा (Mango)

आंबा आणि पेरू यांचे एकत्रित वार्षिक उत्पादन सुमारे ५५ दशलक्ष टन आहे. हे फळ गोड आणि सुगंधी स्वादासाठी प्रसिद्ध आहे

टोमॅटो (Tomato)

टोमॅटो दरवर्षी १८२ दशलक्ष टनांहून अधिक उत्पादनासह जागतिक उत्पादनात आघाडीवर आहे. जरी ते स्वयंपाकात भाजीपाला म्हणून वापरले जात असले, तरी वनस्पतीशास्त्रानुसार ते फळ आहे

येथे क्लिक करा