Best Protein Sources | प्रोटिनसाठी बेस्ट काय: उकडलेले अंडे की पनीर?

अविनाश सुतार

प्रोटिनची गरज भागविण्यासाठी उकडलेले अंडे आणि पनीर हे दोन पर्याय आहेत

अंडे आणि पनीर प्रथिनांचा आणि आवश्यक पोषक तत्वांचा महत्त्वाचा स्त्रोत आहेत

दोन मोठ्या उकडलेल्या अंड्यामध्ये १३ ग्रॅम प्रथिने, १०-११ ग्रॅम फॅटस, १५५ कॅलरीज मिळतात

अंड्यात व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, सेलेनियमसारखे पोषक घटक असतात

१०० ग्रॅम पनीरमध्ये १८ ग्रॅम प्रथिने, २० ग्रॅम फॅटस आणि २६५ कॅलरीज असतात

पनीर कॅल्शियम आणि फॉस्फरसने परिपूर्ण असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

कमी कॅलरीज आणि फॅटससह प्रोटिन हवे असल्यास उकडलेली अंडी बेस्ट पर्याय आहे

शाकाहारी लोकांसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी पनीर अधिक उपयुक्त ठरते

पनीरमध्ये कॅलरीज जास्त असल्याने दोन्हीपैकी योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे ठरते

येथे क्लिक करा