Colorful Snakes | जगातील १० सर्वाधिक रंगीबेरंगी साप पाहिले का ?

अविनाश सुतार

स्पेकल्ड रेसर

मध्य अमेरिकेत आढळणारा हा चपळ, विषारी नसलेला साप आहे. काळ्या शरीरावर तुरकोईज, हिरवे आणि निळे ठिपके असल्यामुळे तो धावताना चमकणाऱ्या रत्नांसारखा दिसतो

गोल्ड-रिंग्ड कॅट साप

झाडांवर आढळणारा हा साप काळे चमकदार खवले आणि पिवळ्या झगमगत्या पट्ट्यांमुळे उठून दिसतो. आग्नेय आशियाच्या वर्षा वनात आढळणारा हा साप विषारी असून चपळ आहे

पॅराडाईज ट्री साप

आग्नेय आशियाच्या जंगलात पॅराडाईज फ्लायिंग साप आढळतो. हिरवे, पिवळे, लाल आणि काळे खवले असलेला हा साप झाडांवरून झाडांवर झेप घेत glide करतो

सनबीम साप

आग्नेय आशियामध्ये आढळणाऱ्या बिनविषारी या सापाच्या गुळगुळीत, गडद खवल्यांवर सूर्यप्रकाश पडला की इंद्रधनुषी झळाळी दिसते. बहुतेक वेळा तो जमिनीत बिळे करून लपून राहतो

सॅन फ्रान्सिस्को गार्टर साप

हा साप “उत्तर अमेरिकेतील सर्वात सुंदर साप” म्हणून ओळखला जातो. त्याच्या शरीरावर निळसर-हिरव्या रंगाच्या बाजू, गडद लाल-केशरी पट्टे आणि काळे ठिपके असतात

ब्ल्यू पिट वायपर

तुरकोईज निळे खवले आणि धारदार डोळ्यांमुळे हा साप विलक्षण भासतो. आग्नेय आशियामध्ये आढळणारा हा झाडांवर राहणारा विषारी साप आहे. त्याचे सौंदर्य व धोका दोन्ही एकत्र दिसतात

मॅंडरिन रॅटस्नेक

आशियातील दुर्मिळ सापांपैकी हा एक असून, तेजस्वी केशरी पट्टे व काळे गडद पट्टे असलेला हा साप जिवंत कलाकृतीसारखा दिसतो. विषारी नसून भित्रा स्वभावाचा हा साप डोंगराळ जंगलात आढळतो

पेंटेड ब्रॉन्झबॅक

झाडांवर राहणारा साप आग्नेय आशियात मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्याच्या शरीरावर डोक्यापासून शेपटापर्यंत पसरलेली धातूसारखी कांस्य रंगाची पट्टी असते. शरीराचा वरचा भाग काळा तर पोट पांढरट असतो

बोलेन्स अजगर

न्यू गिनीच्या थंड डोंगराळ भागात आढळणारा हा अजगर दुर्मिळ आणि अत्यंत सुंदर मानला जातो. त्याचे गडद काळे शरीर सूर्यप्रकाशात निळे, जांभळे आणि सोनेरी रंगासारखे दिसते

आशियन व्हाइन साप

हा साप चमकदार हिरव्या रंगाचा असून त्याचा टोकदार थूथन आणि पानासारखे शरीर असते. झाडांमध्ये लपून राहतो. त्याचा रंग व धारदार डोळ्यामुळे तो आकर्षक दिसतो

येथे क्लिक करा