आपल्या नकळत घरातील वातावरण दूषित करणाऱ्या आणि आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या वस्तू घरात ठेवू नका .आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या वस्तूंची यादी आरोग्यतज्ज्ञांनी दिलेली आहे. जास्त साखर असलेले बिस्किट्स, रिफाइंड मैद्याने भरलेले पदार्थ आरोग्यासाठी अजिबात योग्य नाहीत.लुफा (Loofah) स्वच्छ करणे कठीण असतो, खरखरीत, जंतूंना वाढीसाठी पोषक असतो, त्यामुळे तो घरात ठेऊ नये . बहुतेक लोक महिनोन्महिने बाथरूममधील मऊ स्पंज बदलत नाहीत, त्यामुळे तो जंतूंचा अड्डा बनतो .सुगंधी सॅनिटरी पॅड्स – त्वचेला त्रास देतात, संसर्गाचा धोका वाढवतात, त्यामुळे सॅनिटरी पॅड्स जास्त वेळ घरात ठेऊ नये.मच्छर अगरबत्ती (coils) – त्यातून निघणारा धूर विषारी असतो, विशेषतः मुलांसाठी आणि दमा असलेल्या रुग्णांसाठी घातक असतो.उघडी किचन डस्टबिन्समुळे माशा, जंतू आणि घाणेरडे वास आकर्षित करतात, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.वरील वस्तू आरोग्यास मोठा धोका पोहोचवू शकतात. त्यासाठी काही सुरक्षित पर्यायांचा अवलंब करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे .येथे क्लिक करा