Weight Loss Tips : सकाळच्या व्यायामातून वजन कमी करायचंय? जाणून घ्या खास टिप्स

पुढारी वृत्तसेवा

सकाळचा व्यायाम चयापचय (Metabolism) वाढवतो. तुमच्या दिवसाला शिस्तबद्ध सुरुवात करून देतो.

फक्त व्यायाम करणे पुरेसे नाही; दिनचर्या, पोषण आणि सातत्य यामध्ये काही छोटे बदल केल्यास वजन कमी करण्याच्या परिणामांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.

सकाळची सुरुवात एक ग्लास पाण्याने केल्यास पचनक्रिया सुधारते. वर्कआउट दरम्यान शरीराला ऊर्जा अधिक प्रभावीपणे वापरण्यास मदत होते.

सकाळी केळी, मूठभर सुकामेवा किंवा पीनट बटर टोस्ट यासारखे पदार्थ निवडा. हे तुम्हाला ऊर्जा देतील; पण पोट जड वाटू देणार नाहीत.

काही संशोधनानुसार, उपाशीपोटी केलेला व्यायाम अधिक चरबी जाळण्यास मदत करू शकतो; पण हा प्रयोग दररोज न करता फक्त अधूनमधूनच करावा.

शरीराचे वजन वापरून केलेले व्यायामात डंबेल किंवा रेझिस्टन्स बँड्स यांचा समावेश करा. स्नायू विश्रांती घेतानाही जास्त कॅलरी बर्न करतात, ज्यामुळे एकूण चरबी कमी होण्यास मदत होते.

२० मिनिटे चालणे/जॉगिंग आणि त्यानंतर १५ मिनिटे कार्डिओ करा.

सकाळच्या कोवळ्या उन्हात बाहेर पडा. यामुळे चयापचय सुधारतो. व्यायामाची कार्यक्षमता आणि तुमचा मूड देखील चांगला होतो.

व्‍यायामानंतर 'कूल डाऊन' आणि स्ट्रेचिंग करणे विसरू नका. ५ मिनिटांचे 'कूल डाऊन' शरीराच्या रिकव्हरीसाठी मदत करते आणि स्नायू दुखणे थांबवते.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.