Yoga Tips: सकाळी की संध्याकाळी... योगासन करण्याची योग्य वेळ कोणती?

Anirudha Sankpal

आयुर्वेदामध्ये योगाभ्यासासाठी वेळेला अत्यंत महत्त्व आहे, कारण शरीरातील दोष (कफ, पित्त, वात) काळानुसार बदलत असतात.

सकाळची वेळ (कफ काळ): सकाळी शरीर जड आणि मन सुस्त असते, अशा वेळी योगा केल्याने शरीरात नैसर्गिक ऊर्जा निर्माण होते.

सकाळच्या योगाचे फायदे: आळस, कमी ऊर्जा, वजन वाढणे आणि पचनसंस्थेच्या तक्रारी दूर करण्यासाठी सकाळचा योगाभ्यास हा एखाद्या औषधासारखा काम करतो.

सकाळचा योगा केवळ शरीरच नाही, तर मज्जासंस्था संतुलित करून दिवसभर एकाग्रता वाढवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतो.

संध्याकाळची वेळ (वात काळ): ही वेळ तणावमुक्ती आणि चिंता दूर करण्यासाठी योग्य असून, यावेळी शांत आणि संथ योगासने करावीत.

सर्वात मोठी चूक: रात्रीच्या वेळी अतिशय वेगाने किंवा जास्त ऊर्जेचा व्यायाम केल्याने झोपमोड होऊ शकते आणि अस्वस्थता वाढते.

आयुर्वेदाचा सल्ला: सकाळी 'सूर्य नमस्कार' सारखे ऊर्जा देणारे प्रकार करावेत, तर संध्याकाळी दीर्घ श्वसन आणि शरीर शांत करणारी स्ट्रेचिंग करावी.

केवळ वेळ आहे म्हणून व्यायाम करण्यापेक्षा, तुमच्या शरीराला नेमकी कधी गरज आहे हे ओळखून योगा करणे म्हणजे खऱ्या अर्थाने 'आयुर्वेदिक जीवनशैली' होय.

थोडक्यात सांगायचे तर, सकाळी योगा केल्याने दिवस सुधारतो आणि संध्याकाळी योगा केल्याने रात्रीची झोप सुधारते.

येथे क्लिक करा