महिलांच्या शरीराची कार्यक्षमता उत्तम राखण्यासाठी विशिष्ट जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता भरून काढणे आवश्यक असते. जाणून घेऊया खास पोषक तत्वांबद्दल....व्हिटॅमिन D3 हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी आणि मूड सुधारण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे..मॅग्नेशियम शांत झोप लागण्यासाठी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त.मासिक पाळीपूर्वीचा त्रास कमी करण्यास मदत करते..ओमेगा-३ शरीरातील जळजळ कमी करते.यामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते..व्हिटॅमिन B12 शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवते आणि मज्जासंस्था निरोगी ठेवते.विशेषतः शाकाहारी महिलांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे..लोह केस गळती थांबते आणि शारीरिक क्षमता वाढते.अर्धशिशी सारख्या त्रासावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोह उपयुक्त ठरते..ही पोषक तत्वे शरीराचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी गरजेची आहेत..ही पोषक तत्वे शरीरासाठी गरजेची असली, तरी कोणतेही सप्लीमेंट सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.