पुढारी वृत्तसेवा
सकाळचे कोवळे उन्ह शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी निसर्गाने दिलेले एक अमूल्य वरदान आहे.
सकाळी १०च्या आत ३० मिनिटे उन्हात घालवल्यास रात्री लवकर झोप येण्यास मदत होते.
सूर्यप्रकाशामुळे शरीरामध्ये 'सेरोटोनिन' (हॅपी हार्मोन) नावाचे आनंदी रसायन तयार होते.
१० ते ३० मिनिटे सूर्यप्रकाशात वेळ घालवल्याने शरीराला आवश्यक व्हिटॅमिन-डी हाडे बळकट करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
सकाळच्या सत्रात जितका जास्त वेळ तुम्ही उन्हात वावर जाल, तितकी रात्री वारंवार जाग येण्याची समस्या कमी होत जाते.
सकाळच्या प्रहरी उन्हात थोडा वेळ थांबल्यामुळे दिवसभरातील कामांवर लक्ष केंद्रित करणे सोपे होते आणि मन अधिक सतर्क राहते.
सकाळच्या उन्हामुळे मेंदूला कॉर्टिसोल (ऊर्जेसाठी उपयुक्त हार्मोन) सोडण्याचे संकेत मिळतात. यामुळे पचनशक्ती सुधारून वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सकाळी लवकर उन्हाच्या संपर्कात आल्याने शरीराची पचनशक्ती सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते.