पुढारी वृत्तसेवा
सकाळी उन्हात काहीवेळ व्यतित करणे हे संपूर्ण शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी निसर्गाने दिलेले एक मोफत साधन आहे.
सकाळी १० ते ३० मिनिटे उन्हात घालवल्यास रात्री लवकर झोप लागण्यास मदत होते.
सूर्यप्रकाशामुळे शरीरात 'सेरोटोनिन' (आनंदी हार्मोन) तयार होते, ज्यामुळे नैराश्य किंवा डिप्रेशन दूर होण्यास मदत होते.
सकाळी जितका जास्त वेळ तुम्ही उन्हात घालवाल, तितकी मध्यरात्री जाग येण्याचे प्रमाण कमी होते.
सकाळी उन्हात थांबल्याने दिवसभर कामात लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक सतर्क राहता.
सकाळचे किरण मेंदूला मेलाटोनिनचे उत्पादन थांबवण्याचा आणि कॉर्टिसोल सोडण्यास सुरुवात करण्याचा संकेत देतात. यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा मिळते.
सकाळी लवकर उन्हाच्या संपर्कात आल्याने शरीराची पचनशक्ती सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
रोज फक्त १० ते ३० मिनिटे उन्हात थांबल्याने शरीराला 'व्हिटॅमिन-डी' मिळते. ते हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गरजेचे असते.