पुढारी वृत्तसेवा
शेवगा (मोरिंगा) हा स्वयंपाकघर आणि आरोग्यविषयक उत्पादनांमध्ये परिचित असलेला महत्त्वाचा घटक आहे
ब्राझीलमधील साओ पाउलो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात मोरिंगा (शेवगा) ही भारतातील मूळ वनस्पती पाण्यातील मायक्रोप्लास्टिक्स काढून टाकण्यास मदत करू शकते
शेवग्याची पाने आणि बिया पौष्टिकतेसाठी मोठ्या प्रमाणावर खाल्ल्या जातात मात्र, त्याच्या बियांमध्ये पाणी शुद्ध करण्याचा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे
मोरिंगाच्या बियांपासून तयार केलेला क्षारयुक्त अर्क पाणी शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अॅल्युमिनियम सल्फेट या रसायनाप्रमाणेच कार्य करतो
अॅल्युमिनियम सल्फेट पाण्यातील अशुद्ध घटक एकत्र गोळा करून त्यांना वेगळे करण्यास मदत करतो, त्याचप्रमाणे शेवगाही पाणी शुद्ध करण्यास मदत करतो
अधिक क्षारीय (अल्कलाइन) पाण्यात मोरिंगाचा वनस्पतीजन्य अर्क अॅल्युमिनियम सल्फेटपेक्षाही अधिक प्रभावी ठरू शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे
मोरिंगाच्या बियांचा अर्क हा विद्युतभार निष्प्रभ करून सूक्ष्म कण एकमेकांना चिकटून मोठे गट तयार करतो, त्यांना सहजपणे वेगळे करतो
शेवगा जैवविघटनशील (बायोडिग्रेडेबल) आहे, त्यात हानिकारक रसायने नसतात आणि त्याचा अर्क घरच्या घरीही तयार करता येतो
परिणामी ग्रामीण भाग आणि लहान समुदायांसाठी मोरिंगा हा पाणी शुद्ध करण्यासाठी अधिक किफायतशीर आणि परिणामकारक पर्याय ठरू शकतो