Protein Foods | अंडी-चिकनला पर्याय: 'हे' ५ प्रथिनयुक्त शाकाहारी पदार्थ माहीत आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

अंडी, चिकनमधूनच प्रोटीन मिळतात असे नाही, तर काही शाकाहारी पदार्थांपासूनही उच्च दर्जीची प्रोटीन मिळतात

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. पाल यांनी पाच शाकाहारी प्रथिनयुक्त पदार्थ सुचविले आहेत, जे आतड्यांतील चांगल्या जिवाणूंना (गट बॅक्टेरिया) पोषक ठरतात

या पदार्थांमध्ये तंतुमय घटक (फायबर) किंवा प्रोबायोटिक्स किंवा दोन्ही असतात

तर, प्रथिनांसोबत फायबर किंवा किण्वन (फर्मेंटेशन) असल्यास ते केवळ प्रथिनांपेक्षा गट मायक्रोबायोमसाठी अधिक फायदेशीर ठरतात

भिजवून अंकुर आणलेले हिरवे मूग काही जीवनसत्त्वे वाढवितात, पचन सुलभ करतात आणि फायबरचे प्रमाणही वाढवतात

घट्ट गाळलेले दही प्रथिनांनी समृद्ध असते आणि त्यात जिवंत सूक्ष्मजीव (प्रोबायोटिक्स) असतात, जे आतड्यांसाठी उपयुक्त आहेत

सोयाबीनच्या दुधापासून तयार केलेला हा पनीरसारखा पदार्थ पूर्ण प्रथिनांचा स्रोत आहे आणि त्यात संतृप्त मेद कमी असतो

दुधापासून बनवलेले पण कमी चरबीयुक्त पनीर, ज्यामुळे प्रथिनांचे प्रमाण जास्त राहते आणि काहींना ते हलके वाटते

टेम्पेह हा किण्वित सोयाबीनपासून तयार केलेला घट्ट पदार्थ, ज्यामुळे पचन सुलभ होते आणि गटसाठी उपयुक्त घटक वाढतात

येथे क्लिक करा