Diwali Fitness Tips | दिवाळीत फराळाचा आस्वाद घ्या अन् असा टिकवा फिटनेस

अविनाश सुतार

दिवाळीत तुंम्ही काय आणि किती खात आहात याकडेही लक्ष द्या. फक्त चवीसाठी खा, पोट भरण्यासाठी नव्हे

साखरेऐवजी गूळ घातलेले फराळाचे पदार्थ खा. त्यामुळे कॅलरी कमी होण्यास मदत होईल, त्याचबरोबर तळलेले पदार्थ जास्त खाण्याचे टाळा

दिवाळीत घरकामात मदत करा. यामुळे तुमची शारीरिक हालचाल टिकून राहील आणि अतिरिक्त कॅलरीही बर्न होतील

बाजारात, इतर कुठे ही जायचे असल्यास शक्यतो पायी जा, त्यामुळे शरीर सक्रिय राहून फिटनेस वाढेल

जेव्हा काही खाण्याची इच्छा होते, तेव्हा आधी पाणी प्या. भूक लागल्यासच खा.

पाणी जास्त प्यायल्याने अनावश्यक कॅलरी घेण्यापासून मदत होईल, शरीर हायड्रेट राहील तसेच भूकही कमी लागेल

जिमला जा किंवा रनिंग करा. यामुळे शरीरातील जास्त कॅलरी बर्न होतील आणि तुम्ही “कॅलरी इन” व “कॅलरी आउट” यामध्ये योग्य समतोल राखू शका

पचनशक्ती वाढवण्यासाठी लिंबू किंवा जिरे घालून एक कप कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा

ओट्स, पोहे किंवा फळे यासारखे हलके आणि निरोगी पदार्थ खाल्ल्याने तुमचा चयापचय नियंत्रित राहतो

येथे क्लिक करा