पुढारी वृत्तसेवा
मूग डाळ पचायला हलकी असते. पोटविकार किंवा ॲसिडिटीचा त्रास असणार्यांसाठी ही डाळ पौष्टिक आहार मानली जाते.
मूळ डाळीमध्ये प्रोटीन, फायबरचे प्रमाण भरपूर असते. पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
शाकाहारी लोकांमध्ये स्नायूंच्या बळकटीसाठी आणि शरीराच्या योग्य वाढीसाठी ही डाळ अत्यंत आवश्यक आहे.
मूग डाळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करतात.
'डाइबेटीस केअर' जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, मूग डाळीचा ग्लायसेमिक खूप कमी असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
मूळ डाळीमध्ये विटामिन्स 'बी' आणि लोह (Iron) भरपूर प्रमाणात असते. हे शरीरातील रक्ताभिसरण सुधारून दिवसभर ऊर्जा ठेवण्यास मदत करते.
मूग डाळीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून विविध संसर्गांपासून संरक्षण करतात.
'डर्मेटॉलॉजिकल सायन्स' मधील अभ्यासानुसार, मूग डाळीतील अँटिऑक्सिडंट्स आणि कॉपर त्वचेच्या पेशींना बळकटी देतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
मूळ डागमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर बद्धकोष्ठता दूर करून पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.