Foods For Better Sleep : गाढ झोप हवीय? मग झोपण्यापूर्वी आवर्जून खा हे ८ मॅग्नेशियमयुक्त पदार्थ!

पुढारी वृत्तसेवा

केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम दोन्ही भरपूर प्रमाणात असतात. एका केळातून शरीराला सुमारे ३२ मिग्रॅ मॅग्नेशियम मिळते. ते झोप सुधारण्यास मदत करते.

दह्यामध्ये असणारे मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि प्रथिनांसोबत एकत्र येऊन हाडे मजबूत करण्याचे काम करते. तसेच हे रात्रीच्या शांत झोपेसाठीही फायदेशीर ठरते.

पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए शिवाय पुरेशा प्रमाणात असणारे मॅग्नेशियम चांगल्या आणि गाढ झोपेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

पौष्टिक आणि मॅग्नेशियमने समृद्ध असलेले ओट्स रात्रीच्या हलक्या खाण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. एक कप ओट्समधून सुमारे ६१ मिग्रॅ मॅग्नेशियम मिळते.

डार्क चॉकलेटमध्ये असणारे मॅग्नेशियम मनाला आराम देण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.

भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियमचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. तुम्ही त्या दह्यामध्ये, ओट्सवर किंवा सॅलडमध्ये भुरभुरून खाऊ शकता किंवा थेट स्नॅक्स म्हणून सेवन करू शकता.

Pumpkin Seeds

अवाकाडो केवळ खायला स्वादिष्ट नसून मॅग्नेशियमयुक्त देखील आहे. एका मध्यम आकाराच्या अवाकाडोमधून सुमारे ५८ मिग्रॅ मॅग्नेशियम मिळते.

Canva photo

पालक हा मॅग्नेशियमचा खजिना आहे! एका कप शिजवलेल्या पालकमधून मिळणारे सुमारे१५७ मिग्रॅ मॅग्नेशियम उत्तम झोपेसाठीही खूप गुणकारी ठरते.

Spinach
येथे क्‍लिक करा.