विशेषतः शाकाहारी लोकांसाठी मूग डाळीचे सेवन एक पौष्टिक पर्याय आहे .मूग डाळीमध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, लोह, सोडियम भरपूर प्रमाणात असते.मुगाची डाळ ही प्रथिनांच्या अत्यंत समृद्ध स्रोतांपैकी एक आहे .१०० ग्रॅम मूग डाळीचे सेवन केल्यास त्यातून शरीराला सुमारे ३४७ कॅलरीज मिळतात.एक कप मूग डाळीमध्ये सुमारे १४ ते १६ ग्रॅम प्रथिने असतात.मूग डाळीमध्ये खनिजे असल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.मूग डाळ वजन कमी करण्यासोबतच रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासदेखील मदत करते.हिरव्या मूग डाळीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.How to remove spectacles | चष्म्याचा नंबर घालवण्याच्या ९ टिप्स