Monsoon Bike Safety |आला पावसाळा दुचाकी सांभाळा!

Namdev Gharal

टायर्सची तपासणी करा

पावसाळ्यात रस्‍ते अतिशय निसरडे असतात त्‍यामुळे टायरचे ग्रिप चांगले असणे गरजेचे आहे. त्‍यामुळे गुळगुळीत किंवा जुने टायर्स असतील तर बदलून घ्या.

ब्रेक्सची योग्य तपासणी करा

ओल्या रस्त्यावर ब्रेक पटकन लागणे आवश्यक असते. ब्रेक पॅड्स झिजलेले नसावेत, त्‍यामुळे ब्रेकची तपासणी करुन घ्‍या

हेडलाईट, इंडिकेटर्स चेक करुन घ्‍या

रात्रीच्या वेळी मुसळधार पावसात दृश्यमानता कमी असते, त्यामुळे लाइट्सचा फोकस योग्‍य आहे का याची खात्री करुन घ्‍या.

बाईक असेल तर चेन व ब्रेक केबल्सना ग्रीस लावून घ्‍या

पावसात वादळी हवेमुळे केबल्‍सना गंज लागू शकतो, त्यामुळे त्‍यांना रेग्युलर ऑइलिंग व ग्रीसिंग आवश्यक आहे. चेनलाही ग्रीसिंग करणे आवश्यक आहे.

वॉटरफ्रुफ सीट कव्हर वापरा

पावसामुळे सीट भिजते व लवकर खराब होण्याची शक्‍यता असते त्‍यामुळे वॉटरप्रूफ सीट कव्हर घाला

मडगार्ड आणि फ्लॅप्स लावणे आवश्यक

बाईक चालवताना पुढील चाकातून इंजिनवर चिखल उडत असतो मडगार्ड लावल्यास गाडी स्वच्छ राहते.

बॅटरी आणि वायरिंग तपासा

पावसात बराचवेळ गाडी उभी राहिल्‍या पाण्यामुळे शॉर्टसर्किट होऊ शकतो, त्यामुळे वायरिंग सुरक्षित आहे का हे बघा. यामुळे गाडी सुरु होण्यास अडचण येऊ शकते.

प्लग तपासून घ्‍या

पावसामुळे प्लगला पाणी लागून, स्‍पार्किंग होत नाही त्‍यामुळे गाडी स्‍टार्ट होण्यास दमवते. यासाठी प्लग कोरडा राहील याची काळजी घ्‍या, जुना झाला असल्‍यास बदललेला चांगला.

पार्किंग करताना वॉटरफ्रुफ कव्हर वापरा

गाडी पार्क करताना वॉटरप्रूफ कव्हर वापरा. यामुळे गाडी जास्‍तवेळ भिजल्‍याने येणारे प्रॉब्‍लेम येणार नाहीत

नियमित वॉटर सर्व्हिसिंग करा

पावसात चिखल, खड्डयातील पाणी यामुळे दुचाकी लगेच अस्वच्छ होते. त्‍यामुळे वेळेत सर्व्हिंसिंग केली तर गंज कमी लागतो.

येथे क्‍लिक करा