Unique Cattle | विशाल शिंगाबरोबरच धिप्पाड शरीरयष्‍टी : जगातील काही वैशिष्‍ट्यपूर्ण गोवंश

Namdev Gharal

अन्कोले-वाटुसी (Ankole-Watusi )

ही जात मुळची आफ्रिकन असून याची शिंगे सर्व गोवंशामध्ये लाब असतात ( ८ फूट इतकी लांब)

टेक्सास लाँगहॉर्न (Texas Longhorn )

ही जात मुळची अमेरिकेतील असून याची शिंगे 7 फूटांपेक्षा जास्त लांब असतात व वक्र आकारात वाढतात.

हंगेरीयन ग्रे

या हंगेरीयन बैलाच्या शिंगाचे वैशिष्ट्य म्‍हणजे सरळ आणि टोकदार शिंगे यांचा उपयोग पूर्वी शेती कामासाठी केला जात असे

वाटुसी (Watusi)

या आफ्रिकन प्रजातीच्या गायी बैलांच्या शिंगांचा व्यास खूप मोठा असतो ती आतून पोकळ असतात

हायलँड

स्कॉटलंडमधील या गोवंशाचे वैशिष्ट्य म्‍हणजे जाड केसाळ शरीर, याचा उपयोग विषेशतः मांस उत्पादनासाठी केला जातो

कांकरेज

हे भारतातील गुजरात राज्‍यातील जात असून मोठी व व्रक्राकार विशाल शिंगे; हे याचे वैशिष्‍ठ्य. ही जात दमदार आणि सुंदर दिसते

ओंगोल (Ongole)

भारतातील आंध्रप्रदेश येथील जात असून याचे मजबूत शरीर यासाठी ही वैशिष्‍ट्यपूर्ण असतात.

स्पॅनिश फाइटिंग बुल

हा आक्रमक स्‍वभावाचा बैल स्पेनमधील पारंपारिक बुल फायटिंगसाठी वापरला जातेा याची शिंगे अतिशय टोकदार असून स्‍वभाव आक्रामक असतो.

बोरान (Boran Cattle )

आफ्रिकेतील मुख्यत केनिया देशात ही प्रजाती प्रामुख्याने याचा उपयागे मांस उत्‍पादनासाठी केला जातो. याची शरीयष्‍टी अतिशय धिप्पाड असते.

थारपारकर (Tharparkar)

ही भारतीय प्रजाती असून राजस्थान व आसपासच्या प्रदेशात ही आढळते या प्रजातीच्या गायी जास्‍त दूध देणाऱ्या असतात तसेच याचे रुपही देखणे असते.

रेकॉर्ड ब्रेक! ५०० किलोच्या महाकाय ॲनाकोंडाचा शोध