पुढारी वृत्तसेवा
मेकअप करण्यापूर्वी चेहरा चांगला स्वच्छ करा. त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाम काढल्यास मेकअप अधिक काळ टिकू शकतो.
प्रायमर त्वचा आणि मेकअप यांच्यामध्ये एक संरक्षक थर तयार करतो, ज्यामुळे मेकअप लवकर वितळत नाही.
ओल्या आणि दमट हवामानात जड क्रीमऐवजी हलका, ऑइल-फ्री मॉइश्चरायझर वापरणे चांगले.
मस्कारा, आयलाइनर आणि काजळ वॉटरप्रूफ निवडल्यास घाम किंवा पावसामुळे मेकअप खराब होण्याची शक्यता कमी होते.
जाड थर लावण्याऐवजी हलके फाउंडेशन किंवा बीबी क्रीम वापरा. यामुळे मेकअप केकी दिसत नाही.
कॉम्पॅक्ट किंवा सेटिंग पावडर वापरा
सेटिंग पावडर अतिरिक्त तेल शोषून घेते आणि मेकअप जास्त वेळ ताजा ठेवण्यास मदत करते.
दमट हवामानात पावडर ब्लश आणि ब्रॉन्झर अधिक काळ टिकतात.
मेकअप पूर्ण झाल्यानंतर सेटिंग स्प्रे वापरल्यास तो अधिक काळ जागेवर राहण्यास मदत होते.
चेहऱ्यावर तेलकटपणा दिसल्यास ब्लॉटिंग पेपरने अतिरिक्त तेल काढा. यामुळे मेकअप खराब न होता फ्रेश दिसतो.