पुढारी वृत्तसेवा
हिंदू धर्मात पूजा-अर्चा करताना लाल किंवा पिवळा धागा बांधण्याची परंपरा आहे. पण सध्या काळा धागा बांधण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, काळा धागा भगवान शंकराचे रौद्र रूप 'महाकाल' आणि 'कालभैरव' यांच्याशी संबंधित मानला जातो. शिवभक्त याला देवाचा आशीर्वाद मानतात.
भारतीय परंपरेत काळ्या रंगाला वाईट नजरेपासून वाचवणारा रंग मानले जाते. काळा धागा बांधल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि आत्मविश्वास वाढतो, अशी श्रद्धा आहे.
हा धागा बांधताना ३, ५ किंवा ७ गाठी मारल्या जातात. यातील ३ गाठी मारण्याची परंपरा सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
काळ्या धाग्याला मारलेल्या ३ गाठींना श्रद्धा, सुरक्षा आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच मंदिराबाहेर पुजारी अनेकदा ३ गाठी मारूनच हा धागा बांधतात.
कोणत्या दिवशी बांधावा?
धार्मिक मान्यतेनुसार, सोमवार, मंगळवार आणि शनिवार हे दिवस काळा धागा बांधण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात.
काळा धागा बांधण्याच्या फायद्यांविषयी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. हा पूर्णपणे लोकांच्या वैयक्तिक श्रद्धेचा आणि धार्मिक विश्वासाचा भाग आहे.