पावसाळ्यात घरातील बुरशी टाळण्यासाठी 'या' टीप्स नक्की फॉलो करा...

पुढारी वृत्तसेवा

घरातील हवा खेळती ठेवा

पावसाळ्यात खिडक्या उघड्या ठेवून घरातील हवा खेळती ठेवा, जेणेकरून ओलावा साचणार नाही.

कपड्यांची नीट काळजी घ्या

ओले कपडे घराच्या आत वाळत घालणे टाळा; यामुळे आर्द्रता वाढून बुरशी येण्याची शक्यता असते.

कपाटात 'सिलिका जेल' वापरा

बुरशीपासून बचावासाठी कपाटात सिलिका जेलचे पाकीट किंवा डांबर गोळ्या (Naphthalene balls) ठेवा.

भिंतींकडे लक्ष द्या

भिंतींवर ओलावा किंवा डॅम्पनेस दिसत असेल तर त्वरित उपाय करा, कारण तिथे बुरशी लवकर वाढते.

नियमित स्वच्छता करा

घरातील कोपरे आणि फर्निचरच्या मागील जागा कोरड्या आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.

इन्डोअर प्लांट्सची काळजी

घरातील कुंड्यांमध्ये पाणी साचणार नाही याची खात्री करा, कारण कुंडीतील मातीचा ओलावा बुरशीला आमंत्रण देतो.

बुक्स आणि कागदपत्रे सांभाळा

पुस्तके किंवा महत्त्वाची कागदपत्रे प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा कोरड्या जागी ठेवा, जेणेकरून बुरशी लागणार नाही.

एक्झॉस्ट फॅनचा वापर

स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये 'एक्झॉस्ट फॅन'चा वापर करा, ज्यामुळे वाफ आणि ओलावा बाहेर निघून जाण्यास मदत होईल.

येथे क्लिक करा...