Monsoon Health Tips : पावसाचे पाणी पिणे आरोग्यासाठी सुरक्षित की धोकादायक?

पुढारी वृत्तसेवा

आकाशातून पडणारे पावसाचे पाणी किती सुरक्षित आहे? काय आपण ते प्यायला हवे? चला जाणून घेऊया!

पावसाचे पाणी हे नैसर्गिक आणि थेट आकाशातून येणारे शुद्ध पाणी असते, पण ते खरंच शुद्ध असते का?

पावसाच्या पाण्यात नैसर्गिक खनिजे असतात. योग्य प्रक्रिया केल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.

पावसाचे शुद्ध केलेले पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करू शकते.

मात्र, पावसाचे थेट पाणी पिणे योग्य नाही. हवेमधील धूर, रसायने व धूळ पाण्यात मिसळून ते असुरक्षित बनवतात.

छतांवरून वाहून येणारे पाणी जंतूसंक्रमण वाढवू शकते. पोटदुखी, जुलाब, टायफॉईड यांचा धोका वाढू शकतो.

औद्योगिक भागांत आम्लवृष्टी (ॲसिड रेन) होते, असे पाणी त्वचेसाठीही घातक ठरू शकते.

तज्ज्ञ सांगतात, पावसाचे पाणी प्यायचे असेल, तर ते फिल्टर करून आणि उकळूनच प्यावे.

पावसाचे पाणी शुद्ध केल्याशिवाय पिऊ नये. थेट प्यायल्यास आरोग्याला धोका होऊ शकतो.

Canva Image
३ जुलै ‘इंटरनॅशनल प्लास्‍टिक बॅग फ्री डे’ जाणून घेऊ याविषयी