Namdev Gharal
Single use plastic bag (कॅरी बॅग) पासून होणाऱ्या पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी अवेरनेस तयार करणे हा उद्देश आहे.
२००९-१० पासून युरोपमध्ये याबाबात पहिल्यांदा जागृती सुरु झाली
प्लास्टिक पिशव्यांचे सुमारे ४०० वर्षे विघटन होत नाही परिणामी नदी नाले समुद्र तुंबन अनेक प्रश्न उद्भवत आहेत.
सर्वात फटका बसतो शहरात फिरणार्या जनावरांना खाद्यपदार्थ असलेल्या अशा पिशव्या ते थेट गिळतात
समुद्री जिवांना जसे की कासव मासे यांना अनेकवेळा या कॅरीबँगमुळे जीव गमवावा लागतो
मायक्रो-प्लास्टिक खाद्यपदार्थात मिसळून माणसांच्या शरीरात पोहोचतात, ज्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो .
प्लास्टिक पिशव्याचा वापर टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे
कर्तव्य म्हणून बाजाराला जाताना आवर्जून कापडी पिशवी नेली पाहिजे
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कॅरीबॅग वर बंदी घातली आहे पण चोरुन याची विक्री होतेच
कापड, जूट, कागदाचे पिशवी या पर्यायांचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे