Foot care tips: पायांची दुर्गंधी येतेय? पावसाळ्यात इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी 'हे' घरगुती पेडीक्योर नक्की ट्राय करा

पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात सतत पाय ओले झाल्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि दुर्गंधीची समस्या उद्भवू शकते.

ही समस्या टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा घरीच नैसर्गिक पद्धतीने 'पेडीक्योर' करणे फायदेशीर ठरते.

एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात खडे मीठ आणि लिंबाचा रस मिसळा आणि १०-१५ मिनिटे पाय बुडवून ठेवा.

लिंबू नैसर्गिक क्लेंजर म्हणून काम करते, तर मीठ पायांचा थकवा आणि बॅक्टेरिया दूर करण्यास मदत करते.

पायांवरील मृत त्वचा (Dead skin) काढण्यासाठी घरगुती स्क्रब किंवा साखरेचा वापर करून हलक्या हाताने मसाज करा.

पावसाळी संसर्ग रोखण्यासाठी पाण्यात कडुलिंबाचा अर्क किंवा 'टी ट्री ऑईल'चे काही थेंब टाकणे अधिक प्रभावी ठरते.

पाय धुतल्यानंतर बोटांमधील जागा टॉवेलने नीट कोरडी करा, कारण ओलाव्यामुळेच इन्फेक्शन वाढण्याचा धोका असतो.

रात्री झोपण्यापूर्वी पायांना चांगले मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल लावा, ज्यामुळे पाय मऊ आणि निरोगी राहतील.

Foot care
येथे क्लिक करा...