पर्यटक निसर्ग सौंदर्याबरोबरच स्थानिक चविष्ट पदार्थ खाण्याचा देखील आनंद घेत असतात.पावसाच्या सरी कोसळू लागल्या की गरमागरम, कुरकुरीत कांदा भजीची आठवण आल्याशिवाय राहवत नाही.सकाळी ट्रेकिंगनंतर गरम कांदापोहे आणि गरम चहा हा नाश्त्याचा उत्तम पर्याय .गरमागरम वडापाव आणि चहा देखील मनाला सुखावून जातो.पावसात , भाजलेले मक्याचे कणीस खाणं म्हणजे मनाला सुखावणारं स्वर्ग सुखच जणू.कोल्हापूर, नाशिक, पुणे अशा ठिकाणी पावसात गरमागरम, झणझणीत मिसळपाव खाण्याची मजा काही औरच.घाटमाथ्यावर मिळणारी गरम झुणका-भाकर, कांद्याचा ठेचा आणि लसणाची चटणी, व्हा...अतुलनीय कॉम्बिनेशन .येथे क्लिक करा...