स्वालिया न. शिकलगार
पावसाळा सुरू होण्यापूर्वी ब्रेक, टायर, हेडलाइट, इंडिकेटर, बॅटरी, वायपर व्यवस्थित करून घ्या
टायरवरील ग्रिप कमी झाल्यास निसरड्या रस्त्यावर वाहन घसरू शकते, झिजलेले टायर बदला
वेग मर्यादित ठेवा आणि अचानक ब्रेक किंवा वेग वाढवणे टाळा
वाहनांपासून पुरेसे अंतर ठेवा, पावसात ब्रेकिंग अंतर वाढते, अपघाताचा धोका कमी होतो
मुसळधार पाऊस, धुक्यात लो-बीम हेडलाइट सुरू ठेवा
रस्त्यावर पाणी साचले असल्यास दुसरा मार्ग निवडा किंवा अतिशय सावधपणे वाहन चालवा
ISI प्रमाणित हेल्मेट, घसरू न देणारे शूज वापरा. ओले कपडे, चप्पल घालून वाहन चालवणे टाळा
कारमध्ये टॉर्च, फर्स्ट-एड किट, टो-रोप, आवश्यक कागदपत्रे वॉटरप्रूफ पाउचमध्ये ठेवावीत