स्वालिया न. शिकलगार
व्हि. एम. भैलुमे निर्मित, आनंदकुमार सरवदे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘कलम का बादशाह’ भेटीला येतोय
या चित्रपटात मोनालिसा बागल, यश डिंबळे, आनंद शिंदे आणि जय मोर्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत
२०२३ मध्ये आलेला ‘रावरंभा’ चित्रपटानंतर मोनालिसा काही काळ पडद्यापासून दूर राहिली
आता या चित्रपटातून २-३ वर्षांनंतर पुन्हा एकदा दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
सत्तेला प्रश्न विचारणारी, सामान्य माणसाच्या हक्कांचा आवाज बनणारी ही कथा उलगडणार आहे
दीक्षा आणि जय या दोन तरुणांच्या संघर्षमय प्रवासाची सशक्त मांडणी चित्रपट करतो
अन्याय, भीती, सत्तेच्या दबावासमोर न झुकता मूलभूत अधिकारांचा आधार घेत ते लढतात
हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे