Anirudha Sankpal
मोमोसोबत खाल्ली जाणारी लाल चटणी दिसायला आकर्षक वाटत असली तरी ती आरोग्यासाठी अनेक धोके निर्माण करू शकते.
लाल रंग
चटणीला चमकदार लाल रंग देण्यासाठी वापरले जाणारे कृत्रिम रंग (आर्टिफिशियल कलर्स) अॅलर्जी आणि त्वचेच्या समस्या कारणीभूत ठरू शकतात.
एमएसजी
चटणीची चव वाढवण्यासाठी त्यात घातले जाणारे 'एमएमएसजी' (MSG) काही लोकांमध्ये डोकेदुखी, मळमळ आणि बेचैनी वाढवू शकते.
सोडियम बेंझाएट
चटणी दीर्घकाळ टिकवण्यासाठी वापरले जाणारे सोडियम बेंजोएटसारखे प्रिजर्वेटिव्ह्ज पचनाच्या तक्रारी आणि अॅलर्जीस कारणीभूत ठरतात.
लाल मिरची
चटणीमधील अतिरिक्त लाल मिरचीमुळे (कॅप्साइसिन) पोटात जळजळ, गॅस, अॅसिडिटी आणि पोटाचे विकार उद्भवू शकतात.
शिळे घटक
काही ठिकाणी चटणी बनवण्यासाठी शिळे किंवा खराब घटकांचा वापर केला जातो, ज्यामुळे फूड पॉइजनिंग आणि उलट्यांचा धोका वाढतो.
अतिरिक्त मीठ
चटणीमध्ये अवाजवी मीठ आणि निकृष्ट दर्जाचे तेल वापरल्यामुळे उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा धोका बळावू शकतो.
अस्वच्छता
स्ट्रीट फूड स्टॉल्सवर चटणी तासनतास खुली ठेवल्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे त्यावर माशा बसून जंतूंचा संसर्ग होऊ शकतो.