Anirudha Sankpal
तुम्हाला चालताना, जिने चढताना धाप लागते किंवा दमल्यासारखं होतंय... वय वाढतंय म्हणून असं होत आहे म्हणत असाल तर थांबा... हा ह्रदयासंबंधीचा रोग असू शकतो
या आजारात हृदयाचा अॉर्टिक व्हॉल्व्ह (महाधमनी झडप) संकुचित किंवा आकुंचन पावतो, ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते.
जेव्हा हृदयावर अतिरिक्त ताण येतो, तेव्हा या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने सविस्तर हृदय तपासणी (Cardiac Evaluation) करणे आवश्यक असते.
चालताना किंवा फिरताना श्वास घेण्यास त्रास होणे (शॉर्टनेस ऑफ ब्रीथ) हे या समस्येचे एक प्रमुख लक्षण आहे.
याशिवाय छातीत जडपणा जाणवणे, चक्कर येणे किंवा अचानक अशक्तपणा येऊन मूर्च्छित पडणे ही या आजाराची इतर लक्षणे आहेत.
अॉर्टिक व्हॉल्व्ह स्टेनोसिसच्या काही निवडक रुग्णांसाठी 'टावी' (TAVI - Transcatheter Aortic Valve Implantation) ही कमीतकमी चिरफाड होणारी उपचार पद्धत फायदेशीर ठरू शकते.
हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भविष्यातील धोके टाळण्यासाठी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर योग्य निदान करून घेणे गरजेचे आहे.