Mohari Health Benefits : केवळ फोडणीसाठी नव्‍हे! मोहरीचे 'हे' 9 औषधी फायदे माहिती आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

भारतीय स्वयंपाकात फोडणीसाठी वापरली जाणारी लहानशी मोहरी केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते.

मसाल्यामध्ये मोहरीचा योग्य प्रमाणात वापर केल्याने जठर आणि आतड्यांना उत्तेजन मिळते. यामुळे पाचक स्राव वाढून भूक सुधारण्यास मदत होते.

मोहरी मधात वाटून खाल्ल्याने सर्दी बरी होते, तर मोहरी, सैंधव आणि साखरेचे मिश्रण छातीतील कफ पातळ करून खोकला कमी करते.

मोहरीचे चूर्ण पाण्याच्या घोटाबरोबर घेतल्याने पोटातील कळ, अपचन आणि पोटशूळ यांसारख्या विकारांमध्ये त्वरित आराम मिळतो.

लाल आणि सफेद मोहरी खरूज आणि पोटातील कृमी नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.

वाताने जखडलेल्या अवयवांवर मोहरीचे लेप लावल्याने सूज उतरते, तसेच मोहरीच्या तेलाच्या मालिशने अर्धांगवायूमध्ये फायदा होतो.

युनानी मतानुसार, मोहरी रक्ताभिसरण सुधारते, आमाशयातील कृमी बाहेर काढते आणि सर्दी-अग्निमांद्य दूर करते.

ॲलोपॅथीमध्ये स्नायूंच्या वेदना आणि मालिशसाठी 'लिनिमेंट ऑफ मस्टर्ड' म्हणून मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो.

मोहरी उष्ण असते. याचा अतिवापर केल्यास जठर व आतड्यांचे नुकसान होऊ शकते,

मोहरीचे हे सर्व औषधी गुणधर्म लक्षात घेऊन रोजच्या आहारात आणि उपचारांमध्ये तिचा उपयोग योग्य प्रमाणातच करावा.

येथे क्‍लिक करा.