Rice Water Benefits : 'भाताची पेज' पिण्याचे हे फायदे ठाऊक आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

पारंपरिक, साधी आणि आरोग्यासाठी अमृतासमान! जाणून घ्या 'भाताची पेज' पिण्याचे अद्भुत फायदे.

पोट बिघडले असेल किंवा अपचनाचा त्रास होत असेल, तर गरमागरम भाताची पेज पोटाला त्वरित आराम देते आणि पचनक्रिया सुधारते.

आजारपणानंतर शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी भाताची पेज अत्यंत प्रभावी कार्य करते.

थकवा आला असल्यास किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास, १ वाटी पेज शरीराला त्वरित ताजी ऊर्जा मिळवून देते.

तांदळातील व्हिटॅमिन-बी, मिनरल्स आणि स्टार्च पेजमध्ये उतरतात, यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

कमी कॅलरी आणि जास्त पाण्याचे प्रमाण असल्यामुळे भाताची पेज खाल्ल्याने पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहते.

भाताच्या पेजमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यास आणि केस मजबूत करण्यास मदत करतात.

तांदूळ जास्त पाण्यात शिजवून गाळलेले पाणी (पेज) घ्या. त्यात थोडे तूप, सैंधव मीठ, जिरे आणि कोथिंबीर घालून गरमागरम आस्वाद घ्या!

येथे क्‍लिक करा.