Namdev Gharal
दुचाकी वाहनांमध्ये 2017 पासून हेडलाईटचा स्विच काढून टाकण्यात आला, BS - VI वाहनांची श्रेणी सुरु झाल्यानंतर ही बदल करण्यात आला
पण असा निर्णय घेण्यापाठीमागे काय कारण असू शकते, किंवा दिवसरात्र असे हेडलाईट का सुरु ठेवले जातात याचे वैज्ञानिक कारण काय हे पाहूया
या तंत्रज्ञानाला AHO (Automatic Headlight On) असे म्हणतात, या निर्णयामागे रस्ते सुरक्षाविषयक उद्दिष्टे आहेत
याचे पहिले महत्वाचे कारण आहे पेरिफेरल व्हिजन Peripheral Vision, मानवी डोळ्यांची रचना अशी आहे की, आपल्याला सरळ रेषेतील वस्तूंपेक्षा हालचाल करणारी किंवा चमकणारी वस्तू लवकर जाणवते
दिवसा हेडलाईट सुरू असल्याने इतर वाहनचालकांना (विशेषतः आरशात पाहणाऱ्यांना) तुमच्या दुचाकीचे अस्तित्व त्वरित जाणवते, ज्यामुळे अपघाताची शक्यता कमी होते.
रस्त्यावरील अपघातांचे एक मुख्य कारण म्हणजे समोरून किंवा बाजूने येणारे वाहन वेळेत न दिसणे.
दिवसा प्रखर सूर्यप्रकाश असताना, सावलीत किंवा धुरकट वातावरणात गडद रंगाच्या दुचाकी पटकन नजरेत येत नाहीत. हेडलाईट चालू असल्यास समोरच्या चालकाचे लक्ष दुचाकीकडे लगेच जाते.
पाऊस, धुके किंवा पहाटेच्या वेळी अनेकदा चालक हेडलाईट लावायला विसरतात. AHO मुळे ही मानवी चूक टळते. खराब हवामानातही वाहन स्पष्टपणे उठून दिसते.
युरोप आणि अनेक प्रगत देशांमध्ये हा नियम अनेक वर्षांपासून लागू आहे. तिथे या नियमामुळे दुचाकी अपघातांच्या प्रमाणात १०% ते १५% घट झाल्याचे दिसून आले आहे.
आधुनिक गाड्यांची इंजिने आणि बॅटरी ही 'AHO' लक्षात घेऊनच डिझाइन केलेली असतात. त्यामुळे बॅटरीवर फारसा ताण पडत नाही.
पूर्वी समोरच्याला दिवसा हेडलाईट सुरु असल्याचा इशारा केला जायचा पण आता बहुतांश लोकांना हे सरकारी नियमामुळे असल्याचे समजू लागले आहे.