Anirudha Sankpal
स्मार्टफोनचा अतिवापर करून Gen Z मध्ये मानसिक, शारीरिक आणि सामाजिक समस्या वाढत आहेत.
साधारणपणे 28% मुलांना मोबाईलचे व्यसन जडले आहे आणि 60% मुलांमध्ये झोपेच्या समस्या दिसतात.
20% मुलांमध्ये दृष्टी कमकुवत होण्याचे प्रमाण वाढले आहे, कमी वयातच चष्म्याची गरज भासते.
Gen Z मधील तरुण वर्ग व्हिडिओ, गेम्स, चॅटिंग, सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीमध्ये तासन्-तास गुंतलेला असतो.
मोबाईलशिवाय राहणं ही कल्पना Gen Z ला अस्वस्थ करते, त्यामुळे त्यांना सतत मोबाइलची गरज भासते.
सततचा मोबाइल वापर एकटेपणा, चिडचिड, डोकेदुखी, निद्रानाश आणि सामाजिक संवादाचा अभाव निर्माण करतो.
Gen Z साठी मोबाइल केवळ संवादाचे माध्यम न राहता मनोरंजन आणि ज्ञानाचा मुख्य स्रोत बनला आहे.
मुलांना लहानपणीच मोबाइल उपलब्ध होत असल्यामुळे त्यांच्या सवयीत मोबाइलचा वापर लवकरच रुजतो.
सोशल नेटवर्किंग, गेमिंग, स्टेटस अपडेट्स, लाइक्स-व्ह्यूज तपासणे यामध्ये सतत स्पर्धा दिसून येत आहे.
मोबाईलच्या व्यसनामुळे मुलांमध्ये आयटी कर्मचारी, विद्यार्थी, शालेय आणि महाविद्यालयीन युवक यांचे प्रमाण जास्त आहे.