जिम आणि डाएटशिवाय वजन कमी करायचंय? 'या सवयी ठरतील गेमचेंजर!

पुढारी वृत्तसेवा

आपल्या दैनंदिन जीवनशैलीत आणि छोट्या-छोट्या सवयींमध्ये बदल करूनही तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता.

फिट दिसण्‍यासाठी मसल्स महत्त्वाचे असतात. म्हणून कॅलरी बर्नसह मसल्स वाढवणारे व्यायाम आवश्‍यक ठरतात.

पुश-अप्स, स्क्वॅट्स, प्लँक सारख्या २० मिनिटांची स्ट्रेन्थ ट्रेनिंगही तासभर धावण्यापेक्षा जास्त परिणामकारक ठरू शकते.

तुम्‍ही किती वेळ व्‍यायाम करता यापेक्षा किती प्रभावी व्‍यायाम करता यावरच सर्व काही अवलंबून आहे.

सलग ५-१० मिनिटे जिने चढणे, उकिडवे बसणे-उठणे, दोरीवर उड्या मारणे हा व्‍यायाम प्रभावी ठरतो.

प्रत्‍येक जेवणामध्‍ये २०-२५ ग्रॅम प्रोटीन घ्‍या. फक्त रात्रीच्‍या आहारात एकदाच प्रोटीन घेण्यापेक्षा दिवसभर विभागून घेतल्यास अधिक फायदा होतो.

फोनवर बोलत असताना चालणे, जाणीवपूर्वक काही वेळ उभं राहणं अशा छोट्या शारीरिक हालचालीनीही कॅलरी बर्न होतात.

दररोजचे ३,०००-४,००० पावलं अधिक चालल्याने एका तासाच्या जिमपेक्षा अधिक कॅलरी बर्न हाेतात.

नियमित ७-८ तासांची झोप फिट राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

जिमला वेळ मिळत नसेल तर व्‍यायाम व आहाराच्‍या छोट्या-छोट्या सवयी फिट राहण्‍यासाठी तुम्‍हाला मोठा लाभ देतील.

येथे क्‍लिक करा.