Mental Health : माइंडफुल मेडिटेशनमुळे खरोखरच वेदना कमी होतात ! संशोधनात मोठा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

माइंडफुल मेडिटेशन म्हणजे काय?

माइंडफुल मेडिटेशन हा ध्यानाचा एक प्रकार आहे. यात विचार, भावना आणि आजूबाजूच्या वातावरणाविषयी क्षणोक्षणी जागरूकता निर्माण केली जाते.

AI-generated image

वर्तमानात जगण्याची कला

या ध्यान प्रकारात वर्तमान अनुभवांवर पूर्ण लक्ष देणे अपेक्षित असते. हा सराव चिंता आणि नकारात्मकता दूर करून मन शांत ठेवण्यास मदत करतो.

AI-generated image

कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संशोधन

माइंडफुल मेडिटेशनवर कॅलिफोर्निया विद्यापीठातील ऍनेस्थेसियोलॉजिस्ट फॅडेल झीदान यांनी एक सखोल अभ्यास व प्रयोगांची मालिका तयार केली होती.

'बायोलॉजिकल सायकियाट्री' जर्नलमध्‍ये संशोधन प्रकाशित

'बायोलॉजिकल सायकियाट्री' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्‍या संशोधनानुसार, माइंडफुलनेस मेडिटेशनमुळे वेदनांची जाणीव आणि भावनिक अनुभवांशी संबंधित मेंदूच्या क्रियाकलापांमध्ये लक्षणीय घट होते.

AI-generated image

FMRI स्कॅनद्वारे तपासणी

या संशोधनात सहभागींच्या मेंदूचे फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (FMRI)स्कॅन करण्यात आले. तसेच हस्तक्षेपापूर्वी आणि नंतर शरीरात होणार्‍या बदलांचा सखोल मागोवा घेण्यात आला.

AI-generated image

मेंदूच्या पेशींमधील संवाद

ध्यानाच्या या प्रकारामुळे व्यक्ती केवळ वर्तमानावर लक्ष केंद्रित करते. याचा सराव मेंदूच्या पेशींमध्ये संवादाचा एक विशेष मार्ग तयार करतो, ज्यामुळे वेदना कमी जाणवतात.

AI-generated image

'प्लेसबो इफेक्ट'पेक्षा अधिक प्रभावी

माइंडफुलनेस मेडिटेशनमुळे होणारा परिणाम हा केवळ 'प्लेसबो इफेक्ट'पेक्षा (निष्क्रिय उपचारांचा भास) अधिक शक्तिशाली आणि प्रभावी असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

AI-generated image

दीर्घकालीन वेदनांवर फायदेशीर

अल्पकालीन किंवा दीर्घकालीन वेदनांनी ग्रस्त असलेल्या लोकांना या ध्यान तंत्राची मोठी मदत मिळते. यामुळे शरीराला वेदनांपासून आराम मिळून मन स्थिर होते.

AI-generated image

अगदी सोप्या पद्धतीने करा सुरुवात

शांत जागा निवडून डोळे बंद करा आणि ५ ते १० मिनिटे दीर्घ श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा. विचार विचलित झाल्यास पुन्हा शांतपणे श्वासावर मन आणा.

AI-generated image
येथे क्‍लिक करा.