पुढारी वृत्तसेवा
झोप ही संपूर्ण शरीराला पुन्हा ताजेतवाने करणारी एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील (बर्कले) संशोधकांचा हा अभ्यास ‘सेल’ (Cell) या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
संशोधकांनी मेंदूतील ‘हायपोथॅलॅमस’ या भागावर लक्ष केंद्रित केले.
संशोधकांना झोपेच्या वेळी ‘ग्रोथ हार्मोन’च्या स्रावाचे नियमन करणाऱ्या चेतासंस्थेच्या सर्किट ओळख पटवण्यात यश आले आहे.
ग्रोथ हार्मोन प्रौढ वयात स्नायूंची झीज भरून काढणे, हाडांचे आरोग्य टिकवणे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत गरजेचा असतो.
गाढ विश्रांती देणाऱ्या नॉन-रेम झोपेच्या काळात ‘सोमॅटोस्टॅटिन’ तयार करणाऱ्या पेशींची हालचाल मंदावते आणि ग्रोथ हार्मोन वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते.
गाढ झोपेत दोघांच्या परस्परविरोधी कार्यामुळे आणि चेतापेशींच्या अचूक समन्वयामुळे ग्रोथ हार्मोनचा स्राव आणखी वाढण्यास मदत होते.
सतत झोपमोड झाल्यामुळे ग्रोथ हार्मोनच्या स्रावाचे संतुलन बिघडते. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
नवीन संशोधनामुळे भविष्यात चयापचयाचे विकार, मेंदू संबंधी आजारांशी निगडित तसेच झोपेच्या समस्यांवर नवे उपचार शोधण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.