दररोज काही क्षण निवांत राहा...मनशांतीपासून आरोग्याचे फायदे अनुभवा

पुढारी वृत्तसेवा

सतत कोणती तरी कृती करत राहणे ही आधुनिक जीवनशैलीच झाली आहे.

Canva

कोणतीही कृती न करता बसणे म्‍हणजे आळशीपणा हा सर्वत्र असणारा समज आहे.

Canva

रिकाम्‍यावेळेत काही तरी करत राहणे ही सर्वांच्‍याच अंगवळणी पडलेली सवय झाली आहे.

Canva

दिवसभरात काही मिनिटे कोणतीही कृती न करता बसणे ही ताणतणावापासून मुक्‍त होण्‍याचा उपाय मानला जातो.

Canva

काहीही न करता निवांत बसणे म्‍हणजे मोबाईल फोन, टीव्‍ही, वाचन यापैकी कोणतीही कृती करायची नाही.

Canva

काही क्षण निवांत बसल्‍याने तुमची एकाग्रता सुधारते. विश्रांतीसाठीचे तंत्र वापरल्याने तुमचे मन शांत होऊन लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.

Canva

निवांत बसण्‍याच्‍या कृती तुम्‍हाला वर्तमान क्षणाबरोबरच वास्‍तवाची जाणीव करुन देतो.

Canva

काेणतीही कृती न करता बसल्‍याने शरीर विश्रांतीच्या अवस्थेत पोहोचते. हृदयाची गती कमी होते आणि रक्तदाबही घटतो.

Canva

काही क्षण निवांत बसल्‍याने ब्रेन स्ट्रोकचा धोका २४% नी कमी होतो, असे काही दिवसांपूर्वी झालेल्‍या अभ्‍यासात स्‍पष्‍ट झाले आहे.

Canva

सततचा तणावामुळे मेंदूच्या पेशींवर परिणाम करतो. काही मिनिटं निवांत बसल्‍याने सेरोटोनिन आणि डोपामिन या 'हॅप्पी' हार्मोन्समध्‍ये वाढ होते.

Canva

निवांत बसण्‍याच्‍या कृती दररोज शक्य नसेल, तर किमान आठवड्यातून काही दिवस ही कृती करुन तुम्‍ही शरीरिक व मानसिक फायदे अनुभवू शकता.

Canva
येथे क्‍लिक करा