mental peace tips| मनशांती हवीय? आहारात ‘हे’ छोटे बदल करा, फरक अनुभवा!

पुढारी वृत्तसेवा

मनशांती आणि आहार यावर मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्समध्ये सखोल संशोधन झाले आहे. या शाखेला 'न्यूट्रिशनल सायकॉलॉजी' असे म्हटले जाते.

मानसशास्त्रीय संशोधनानुसार, आपले पोट 'दुसरा मेंदू' आहे. आपल्या शरीरातील ९५% सेरोटोनिन ('हॅपी हॉर्मोन') हे पोटातील आतड्यांमध्ये तयार होते.

तुमचे पचन संस्था (Gut Health) बिघडलेली असेल, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या मनःस्थितीवर होऊन चिंता आणि नैराश्य वाढू शकते.

अति प्रमाणात साखर किंवा रिफाइंड कार्ब्स (मैदा)चा आहारात असेल तर रक्तातील साखर वेगाने वाढते. साखरेचा हा चढ-उतार व्‍यक्‍तीला चिडचिडे आणि अस्वस्थ बनवतो.

मानसशास्त्रातील 'स्माईल ट्रायल' संशोधनानुसार, ज्यांनी 'मेडिटेरेनियन डाएट' (फळे, भाज्या, कडधान्ये आणि हेल्दी फॅट्स) फॉलो केला, त्यांच्यामध्ये तीव्र नैराश्याची लक्षणे ३० टक्क्यांहून अधिक कमी झाल्याचे दिसून आले.

"चिंता आणि तणाव कमी करायचा असेल तर आहारात अक्रोड, फ्लेक्स सीड्स (अळशी) आणि मासे यांचा समावेश करा. हे मेंदूसाठी 'सुपरफूड' आहेत!"

मानसशास्त्रात केवळ 'काय खाता' यापेक्षा 'कसे खाता' यालाही महत्त्व दिले आहे."थोडं डार्क चॉकलेट खाल्ल्याने 'एंडोर्फिन'ची पातळी वाढते. यामुळे तुमचा मूड त्वरित सुधारतो. पण लक्षात ठेवा, चॉकलेट प्रमाणातच खा!"

"पालक आणि मेथी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम असते. हे खनिज स्नायूंना शिथिल करते आणि मनाला शांत ठेवण्यास मदत करते."

"पाणी कमी प्यायल्याने चिडचिड वाढू शकते. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या आणि शरीरासोबत मनही ताजेतवाने ठेवा."

"रात्री झोपण्यापूर्वी कॅमोमाइल टी किंवा पुदिन्याचा चहा घ्या. यामुळे चांगली झोप लागते आणि दिवसभराचा थकवा दूर होतो."

दही किंवा ताक यांसारखे प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि पर्यायाने मन प्रसन्न ठेवतात."

टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवल्याने मेंदूला तृप्तीचा संदेश उशिरा मिळतो, ज्यामुळे अति जेवण होते आणि नंतर मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते.

शांतपणे, अन्नाचा स्वाद घेत जेवल्याने 'पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टम' ( विश्रांती देणारी यंत्रणा) सक्रिय होते, ज्यामुळे मन शांत राहते.

येथे क्‍लिक करा.