mental peace tips | मन शांत ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्‍या ५ टिप्स

पुढारी वृत्तसेवा

शांत राहणे हे केवळ मौन नसून ती एक मानसिक शक्ती आहे.

शांतता ही संयमाची भाषा असून, ही भाषा संकटातही मार्ग दाखवते; मनाला नवी उमेद देते.

शब्दांच्या युद्धातून माघार घेणे म्हणजे पराभव नसतो, तर शांत राहून स्वतःला जिंकणे हाच खरा विजय असतो, हे कालांतराने सर्वांचाच लक्षात येते.

जाणून घेवूया आयुष्‍यातील तणावाच्‍या प्रसंगी शांत राहण्‍याच्‍या सोप्या टिप्‍स.

जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता आणि हळूहळू सोडता, तेव्हा तुमच्या शरीराला त्वरित आराम मिळतो. ही क्रिया मेंदूला शांततेचा संदेश देते. साचलेला तणाव काही क्षणात कमी करण्यास मदत करते.

मनातील चिंतांपासून लक्ष वळवण्यासाठी एखाद्या अतिशय शांत आणि निसर्गरम्य ठिकाणाची (उदा. झाडी, डोंगर किंवा समुद्रकिनारा) कल्पना करा. ही मानसिक सफर तुम्हाला तणावापासून दूर नेऊन प्रसन्नता देईल.

कोणत्याही गोष्टीवर तातडीने प्रतिक्रिया देण्याऐवजी काही सेकंद थांबा. हा छोटासा विराम तुमचे विखुरलेले विचार पुन्हा व्यवस्थित करण्यास आणि शांत डोक्याने निर्णय घेण्यास मदत करतो.

अस्वस्थ वाटत असल्यास थोडे स्ट्रेचिंग करा किंवा थोडा वेळ चाला. शरीराच्या या हलक्या हालचालींमुळे तणाव कमी होतो, रक्ताभिसरण सुधारते आणि मनाला पुन्हा उभारी मिळते.

दिवसभरातील चांगल्या गोष्टींची आठवण करा आणि त्याबद्दल कृतज्ञ राहा. जेव्हा आपण आयुष्यातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा चिंतेची जागा आपोआप सकारात्मक विचारांनी भरली जाते.

येथे क्‍लिक करा.