अविनाश सुतार
रोज एकाच वेळेला झोपणे हे सकाळी कोणत्या वेळेला उठता किंवा किती तास झोपता या इतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे झोपेची वेळ ठरवून घ्या
त्यामुळे झोपायला जाण्याचा अलार्म लावल्यास नियमित झोपेची सवय लागण्यास मदत होते. सकाळी उठण्याच्या वेळेइतकेच हे महत्त्वाचे आहे
सकाळी कोवळ्या उन्हात फिरल्यास डोळ्यांतून जाणारा प्रकाश शरीरातील अंतर्गत घड्याळ पुन्हा सेट व नियंत्रित करण्यास मदत करतो. यामुळे व्हिटॅमिन डीची निर्मितीही होते
दररोज बाहेर पडा आणि सूर्यप्रकाश डोळ्यांत जाऊ द्या. यामुळे तुमचा सर्केडियन रिदम पुन्हा सुरळीत होतो.
जेवणानंतर १० ते २० मिनिटे चालायला जा. यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणे किंवा कमी होणे आणि चयापचय नियंत्रण सुधारते
मद्यपान सोडल्यास आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो आणि एकूणच जीवनमान सुधारते.
आठवड्यातून किमान एकदा एरोबिक प्रशिक्षण करा. चालत असाल तर वेग वाढवा, धावत असाल तर अधिक वेगाने धावा. यामुळे स्नायू बळकट आणि दीर्घायुष्यास मदत होते
पाणी पिण्यासाठी नेहमी बाटली सोबत ठेवा. पण बाटली जवळ असेल, तर ती सतत पाणी पिण्याची आठवण करून देते.
वजन उचलण्याचा व्यायाम केल्यास स्नायूंचे प्रमाण टिकून राहते, ताकद वाढते, वयामुळे होणारी स्नायूंची घट टाळता येते आणि चयापचय गती वाढते