Namdev Gharal
हिवाळा सुरु झाला की भारतात अनेक युरोप मध्ये आशिया येथून सुदर पक्षी स्थलांतर करतात. उत्तरेकडील अनेक राज्यात पाणथळ ठिकाणी, मुबलक खाद्य असलेल्या ठिकाणी आढळतात जाणून घेऊ काही प्रमुख पक्षी व त्यांचे वास्तव्याचे ठिकाण
Bar-headed Goose हा पक्षी हिमालयाच्या वरुन 8000 मिटर उंचीवरुन प्रवास करुन मध्ये आशिया व तिबेट परिसरातून भारतात येतो. भारतात हिमाचलमधील पाँग डॅम, चिल्का सरोवर ओडिशा याठिकाणी राहतो.
Siberian Crane सायबेरीया या रशियातील अतिथंड प्रदेशातून भारतात हा राजस्थानमधील पाणस्थळ जागेत आढळतो हा दुर्मिळ पक्षी आहे
Greater Flamingo ग्रेटर फ्लेमिंगो हा आफ्रिका, मध्य पूर्व व काही युरोपियन भागातून. भारतात येतो. पश्चिम भारतातील समद्री किनारे मुंबईतील शिवडी किनाऱ्याजवळील पाणथळ जागा. गुलाबी पंख व चालणे हे दृश्य फार सुंदर असते
Demoiselle Crane मध्य युरेशिया (Eurasia), मंगोलिया, उत्तर चीन मधून भारतात येतात पश्चिम राजस्थान मधील Khichan गाव हे प्रमुख निवासस्थान. आहे हजारो क्रेन इथे दिसतात.
Ruddy Shelduck मध्य आशिया, पश्चिम चीन आणि सायबेरीयाच्या काही भागातून हा भारतात येतो. उत्तर भारतातील जलाशय, नद्या, reservoirs आणि पाणथळ प्रदेशात वास्तव्य करतो हा एक सुंदर बदक आहे
Northern Pintail आर्कटिक व युरेशियन भागातून हे बदक येतात. भारतात तलाव पाणथळ जागा. Dal Lake (काश्मीर), Chilika Lake (ओडिशा), याठिकाणी प्रामुख्याने राहतो.
Northern Shoveler (पाणबदक) हा पाणबदक युरोप आणि उत्तरेकडील आशिया येथून येतो उत्तरी भारतातील तालावे, wetlands. तसेच Sukhna Lake (चंदीगड) अशा ठिकाणी हो आढळतो.
Black-tailed Godwit पश्चिम युरोप, मध्य आशिया व सायबेरीया भागातून येतो. भारतात दलदली जमीन, wetlands — उदाहरणार्थ पूर्व भारत, तटीय भाग, पाणथळ प्रदेश.इथे वास्तव्य करतो
Bluethroat युरोप व अलास्का अशा उत्तरेकडील प्रदेशातून. भारतात येतो हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्या येथे आढळतो निळ्या रंगाचा गळा त्यामुळे हा सहज ओळखता येतो
Rosy Starling मध्य आणि पश्चिम आशिया, युरोपमधील काही देशातून येतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य भारतात मोठ्या झुंडी दिसतात.
Eurasian Wigeon आर्कटिक व युरेशियन भागातून, उत्तरेकडील युरोप व सायबेरियातून येतात व भारतात प्रामुख्याने नद्या, तलावं तसेच Okhla Bird Sanctuary, पक्षी सरंक्षण क्षेत्रे, याठिकाणी हा आढळतो.
Gadwall युरोप आणि उत्तरेकडील आशिया येथून येतात. व विविध राज्यातील पाणथळ प्रदेश, तलाव, तसेच शेतीत साठलेल्या पाण्यामध्ये याचा छुपा वावर आहे.
Rosy Pelican युरोप, मध्य पूर्व, आशियाच्या काही भागातून येतो. उत्तरेकडील ताज्या पाण्याचे तलावं, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांत वावर असतो.