डोक्यावर मुकूट असलेल्या या कोंबडीचा थाट असतो महाराणीसारखा!

Namdev Gharal

सर्वसाधारण कोंबडी म्हटली की लाल तुरा असलेले कोबंडी किंवा कोंबडा नजरेसमोर येतो, पण इटतीत अशी एक कोंबडी आढळते की जिचे रुप व थाट दोन्ही एखाद्या महाराणीसारखा असतो

या कोंबडीचे नाव आहे पाडोवाना कोंबडी (Padovana Chicken), इटलीतील पाडुआ (Padua) शहराच्या आसपास ही प्रथम आढळली म्हणून तिचे असे नाव पडले आहे.

या कोंबडीची प्रमुख ओळख म्हणजे डोक्यावर असलेल्या मोठ्या मुकुटासारख्या असलेली पिसे. ही सर्वसाधारण तुऱ्यापेक्षा वेगळी असते. यामुळेच पिसांमुळे तिची ठळक ओळख आहे

पाडोवाना कोंबडीच्या डोक्यावर गोलाकार तुरा किंवा पिसांचा हा मुकुट चौकटीच्या आकाराचा किंवा गोल फुलासारखा दिसतो.

मुकुटासारखा तुरा तसेच या कोंबडीची चालण्याची शैली खूप नाजूक व रॉयल यामुळे हीचा थाट राजेशाहीच असतो.

हा तुरा डोक्याच्या हाडाच्या वरच्या भागावर नैसर्गिकरीत्या उभा राहतो. या पिसांच्या झुंबक्यांमुळे डोळे हिचे डोळे काही प्रमाणात झाकले जातात. त्‍यामुळे ही नेहमी सावध असते.

त्‍याचबरोबर पिसांचा फुललेला घेर ,अंगावरची पिसे मऊ, रेशमी व सजलेल्या पोषाखासारखी असते त्‍यामुळे खुपच आकर्षक दिसते.

तिला "Royal Fancy Chicken" किंवा राजेशाही कोंबडी म्हणतात. सुंदर दिसावी, रॉयल थाट असावा आणि घरात शोभून दिसावी म्हणून हीला पाळली जाते

सौंदर्याच्या कोंबड्यांमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर हिचा क्रमांक येतो. शो-कॉम्पिटिशनसाठी शौकीन लोक हिला पाळतात.

तसेच हिचा आणखी एक गुण म्हणजे अतिशय शांत व माणसाळलेली असते तसेच आवाजही कमी करतात शहरी ठिकाणी पाळायला योग्य असते.

यातील नर: 2–2.5 kg, मादी: 1.5–2 kg इतक्या वजनाची असते तर मादी :अंदाजे 30 ते 38 सें.मी. तर नर : अंदाजे 35 ते 45 सें.मी. इतका असतो. पण डोक्यावरील मुकुटामुळे अधिक उंच दिसते.