Mermaid’s Purse : शार्क माशांची अंडी पाहिली का?

Namdev Gharal

शार्क माशांमध्ये दोन प्रकार असतात एक अंडी देणारी व एक थेट पिलांना जन्म देणारे शार्क (अंडज - जीवज)

अंडी घालणारी शार्क मुख्यता समुद्रातील खडकाळ भागात आपली अंडी घालतात. पण काहीवेळा लांटामुळे ही अंडी समुद्रकिनारी वाहून येतात.

अंडी देणाऱ्यामध्ये कॅटशार्क, हॉर्न शार्क, बॅब्‍मू शार्क यांचा समावेश असतो. या अंड्यांचे कवच जाड व कठीण असते

या अंड्याला मरमेड पर्स्यू (Mermaid’s Purse) मस्‍यकन्येची पिशवी असे नाव आहे. या पिशवीत आतून पिल्‍लाला अन्न मिळण्यासाठी पिवळा बलक असतो.

या अंड्याचे वैशिष्‍ठ्य म्‍हणजे, ही अंडी चौकोनी, लांबट पिशवीसारखी असतात. याच्या टोकाला तंतूसारखा पदार्थ असतो जो समुद्रतळाशी अंडी चिकटण्यास मदत करतो

जीवज प्रकार काही शार्क थेट जिवंत पिल्लांना जन्म देतात. बुल शार्क, हॅमरहेड शार्क, ब्लू शार्क या गटात येतात.

काही शार्क अंडज - जीवज असा असतो यामध्ये टायगर शार्कसारखे मासे येतात. यामध्ये मादी अंडी घालते पण ती शरीरातच उबवली जातात.

कॅट शार्क मासा हा एकावेळी २ ते ४ अंडी घातलो तर हॉर्न शार्क हा एकावेळी फक्‍त दोन अंडी घालतो

ही वाहून आलेल्‍या अंडी यामध्ये काही वेळा जीवंत भ्रूण असू शकते यामुळे यांच्या आसपास शार्कही असू शकतो

शार्क मासा अग्रेसिव्ह असतो. काही वेळा असे अंडे उचलल्‍यास शार्क माणसांवर हल्‍लादेखील करु शकतो.

Beaver : ‘धरण‘ बांधणारा प्राणी पाहिला का?